विद्या प्रसारक मंडळाच्या महाविद्यालयात भारताचा ७७वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

विद्या प्रसारक मंडळाच्या महाविद्यालयात भारताचा ७७वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला. महाविद्यालयातील विद्यार्थी, शिक्षकवृंद तसंच एनसीसी कॅडेट या सोहळ्यात सहभागी झाले होते. विद्या प्रसारक मंडळाचे संस्थापक डॉ. वा ना बेडेकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून या सोहळ्याची सुरूवात झाली. विद्या प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष डॉ. विजय बेडेकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. ध्वजारोहणानंतर एनसीसी कॅडेटनं मानवंदना दिली. भारतीय वाद्ये आणि महाराष्ट्रातील लोककला या पुस्तकांचं प्रकाशन डॉ. विजय बेडेकर यांच्या हस्ते करण्यात आलं.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading