विटावा कोळीवाडा खाडी किनारी ” १ सप्टेंबर हा कोळी भाषा दिन “साजरा

विटावा कोळी ग्रामस्थ मंडळ ” विटावा कोळीवाडा, ठाणे यांनी पुढाकार घेऊन विटावा कोळीवाडा खाडी किनारी ” १ सप्टेंबर हा कोळी भाषा दिन “साजरा केला. विटावा गावात १ सप्टेंबर रोजी गावातील ग्रामस्थाचे निधन झाल्यामुळे संवेदनशीलता आणि प्रसंगावधान दाखवत १ सप्टेंबर याच दिवशी कोळी भाषा दिन साजरा न करता २ सप्टेंबर रोजी कोळी भाषा दिन सायंकाळी साजरा केला. या कार्यक्रमात कोळी भाषेतील कविता, चारोळ्या, प्रबोधनपर कविताचे वाचन, पारंपरिक जुनी कोळी गाते सामुहिकपणे गाऊन, सादर करून त्या गाण्यावर माता, भगिनींनी सामुहिकपणे नाचुन आंनद साजरा करत कोळी भाषा दिन मोठ्या जल्लोषात उत्साहात साजरा केला.

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading