वाहतूक पोलीस कॉन्स्टेबल रामनाथ मेंगाळ यांना साउथ आफ्रिकेत झालेल्या कॉम्रेड मॅरेथॉन स्पर्धेत कांस्य पदक

ठाणे शहरातील वाहतूक पोलीस कॉन्स्टेबल रामनाथ मेंगाळ यांनी साउथ आफ्रिकेत झालेल्या ”कॉम्रेड मॅरेथॉन स्पर्धेत,,कांस्य पदक पटकाविल आहे.
दक्षिण आफ्रिकेतील अतिशय खडतर अशी मानली जाणारी कॉम्रेड मॅरेथॉन स्पर्धा. या स्पर्धेत 20 हजार स्पर्धक  सहभागी झाले होते. 10 अंश तापमानात आयोजित करण्यात येणारी  89 किलोमीटर ची ही स्पर्धा अवघ्या 10 तास 58 मिनिटात पूर्ण करून ठाण्यातील रामनाथ मेंगाळ या वाहतूक पोलीस हवालदाराने देशाचे नाव अटकेपार नोंदले आहे. या स्पर्धेत रामनाथ मेंगाळ यांनी अवघ्या 10 तास 58 मिनिटात  89 किलोमीटरचे अंतर   पार केल्याने त्यांना कांस्य पदकाने सन्मानित करण्यात आले, त्यांच्या बरोबर महाराष्ट्र पोलीस खात्यातून तीन याधिकारी  यांनी सह स्पर्धेत सहभाग नोंदविला होता, यापैकी ठाण्यातील रामनाथ मेंगाळ यांनी सलग दुसऱ्या वर्षी या स्पर्धेत आपले नाव कोरले आहे. यामुळे सलग दोन वर्ष या स्पर्धेत सहभाग नोंदविल्यामुळे रमन्ना यांना ‘बॅक टू बॅक’ या पदकाने सन्मानित करण्यात आले,  ठाणे वाहतूक शाखेत कॉन्स्टेबल या पदावर कार्यरत असताना स्वतःच्या शारीरिक फिटनेस याकडे लक्ष दे या स्पर्धेत सहभागी होऊन उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल त्यांचे ठाणे वाहतूक पोलीस उपयुक्त  डॉक्टर विनयकुमार राठोड यांच्या वतीने सत्कार करण्यात आला, यावेळी रामन्नाथ मेंगाळ यांचे वरिष्ठ सहकारी हेही उपस्थित होते,

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading