वारकरी संप्रदायाचा उद्या ठाणे बंदचा इशारा

वारकरी संप्रदायावर शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांच्याकडून होत असलेल्या टीकेच्या विरोधात
उद्या ठाणे बंदची हाक देण्यात आली आहे. एका पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली. उध्दव ठाकरे शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी गेल्या काही दिवसापूर्वी वारकरी संप्रदाय आणि संत महात्म्यांवर केलेली टीका वादग्रस्त ठरली आहे. त्याच्या प्रतिक्रिया आता उमटू लागल्या असून नाशिकमध्ये सुषमा अंधारे यांच्या निषेधार्थ आज आंदोलन झालं. तर ठाण्यामध्ये सुषमा अंधारेंच्या वारकरी संप्रदाय आणि संत महात्म्यांच्या विरोधात केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ उद्या बंदची हाक देण्यात आली आहे. या बंदला बाळासाहेबांची शिवसेना आणि भारतीय जनता पक्षानंही पाठिंबा दिला आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading