वाघबीळ येथे झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू तर एकजण गंभीर

घोडबंदर रस्त्यावरील वाघबीळ उड्डाणपूलावर काल रात्रीच्या सुमारास झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला. अपघात झाल्याचं कळताच आपत्ती व्यवस्थापन पथक, अग्निशमन दल यांनी तातडीनं घटनास्थळी जाऊन मदतकार्य सुरू केलं. वाघबीळ उड्डाणपूलावरून माल घेऊन जाणारा ट्रक खड्ड्यांमध्ये आदळल्यामुळे ट्रकमधील माल ब्रीज खालून जाणा-या चारचाकीवर पडून गाडीचा चक्काचूर झाला. यामध्ये चारचाकी चालक दीपक कनावजे याचा मृत्यू झाला तर त्याच्याबरोबर असलेला प्रशांत देवरकोंडा हा गंभीर जखमी झाला असून त्याला खाजगी रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. यामध्ये कारचा चक्काचूर झाला असून अपघातानंतर या भागात मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading