वागळे प्रभाग समितीतील काही परिसर आज रात्रीपासून पूर्णत: बंद

आज रात्री १२ वाजल्यापासून ३ मे पर्यंत वागळे इस्टेट प्रभाग समितीतील किसननगर, भटवाडी, गणेशचौक, शिवटेकडी, रोडनंबर १६ आणि रोड नंबर २२ हा परिसर पूर्णत: बंद करण्यात येणार आहे. कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी हा परिसर पूर्ण बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे पूर्णत: बंदच्या काळात दूध, भाजीपाला, मांसविक्री, किराणा, बेकरी हे सर्व बंद असणार असून फक्त औषधाची दुकाने चालू राहतील याची नागरिकांनी नोंद घ्यावी. या परिसरांमध्ये संचारबंदी असतानाही मोठ्या प्रमाणावर लोकं गर्दी करत असल्याचं दिसून आलं होतं. वागळे इस्टेट प्रभाग समितीत एकूणच रूग्णांची होत असलेली वाढ लक्षात घेऊन प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading