वर्तकनगर येथील रेमंड रियालिटीच्या परिसरातील इमारतीच्या पहिल्या माळ्यावरील स्लॅबला क्रॅक

वर्तकनगर येथील रेमंड रियालिटीच्या परिसरातील इमारतीच्या पहिल्या माळ्यावरील स्लॅबला क्रॅक गेला. सेफ्टी नेटवरून डेब्रीज पडल्यामुळे डकच्या स्लॅबला हा क्रॅक गेला होता. आज दुपारी १२ वाजताच्या सुमारास हा प्रकार घडला. रेमंड रियालिटी परिसरातील इमारत क्रमांक अ या तळ अधिक ४२ मजल्याच्या इमारतीतील पहिल्या माळ्यावरील डकच्या सेफ्टीनेटवरून डेब्रीज पडल्यामुळे स्लॅबला क्रॅक गेला होता. सुदैवानं यामध्ये कोणतीही जिवितहानी झाली नाही. आपत्ती व्यवस्थान पथकाने घटनास्थळी जाऊन हा धोकादायक भाग काढून घेतला.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading