मिशन इंद्रधनुष्य मोहिमे अंतर्गत वंचित लाभार्थ्यांचे लसीकरण

मिशन इंद्रधनुष्य ४.० मोहिमे अंतर्गत जिल्ह्यातील वीटभट्टी, झोपडपट्टी भाग, औद्योगिक क्षेत्र आणि इमारत बांधकाम कार्यक्षेत्रातील लसीकरणापासून वंचित लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात येणार आहे. या मोहिमेची दुसरी फेरी ४ एप्रिल पासून सुरू होणार असून १० एप्रिलपर्यंत सुरू राहणार असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी गंगाधर परगे यांनी दिली. मिशन इंद्रधनुष्य 4.0 व्दितीय फेरी मध्ये मुरबाड, कल्याण आणि भिवंडी तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच अंबरनाथ आणि बदलापुर नगरपालिका कार्यक्षेत्रात एकुण 49 लसीकरण सत्रांचे आयोजन केले असुन या सत्रांमध्ये लसीकरणापासुन वंचित राहिलेले 0 ते 2 वर्ष वयोगटातील 418 बालके आणि लसीकरणापासुन वंचित 72 गरोदर मातांचे लसीकरण करण्यात येणार आहे.

 

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading