वर्तकनगर पोलीसांचं चिमणी बचाव अभियान

वर्तकनगर पोलीसांनी चिमणी बचाव अभियान सुरू केलं आहे. या अभियानांतर्गत वर्तकनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक संजय गायकवाड तसंच इतर अधिकारी-कर्मचारी वर्गानं पोलीस ठाण्यात चिमण्यांसाठी विविध ठिकाणी घरटी लावली आहेत. याच पोलीस ठाण्यामध्ये फुलपाखरू उद्यान तयार करण्यात आलं असून या फुलपाखरू उद्यानामध्ये अनेकदा रंगीबेरंगी फुलपाखरं दिसतात. वर्तकनगर पोलीस ठाण्यातील कर्मचारी वर्ग अनेकदा तणावातून मुक्तता मिळावी म्हणून या उद्यानाला भेट देत असतो. चिमणी बचाव अभियान हे ठाणे सिटीझन फौंडेशनच्या सहकार्यानं राबवलं जात आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading