वर्तकनगरमधील बेकायदेशीर अनधिकृत दुकानांवर कारवाई

ठाणे महापालिका क्षेत्रात अतिक्रमण कारवाई सुरु असून वर्तकनगर समितीमधील उपवन येथील समिधा मोहिते यांचे झुणका भाकर केंद्र सिल करून ताब्यात घेतले. झुणका भाकर उपक्रम शासनाने बंद केला असून समिधा मोहिते यांनी तो चालू ठेवला आणि त्यात गुटका,सिगारेट तसेच चायनीज पदार्थ विक्रीस ठेवल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. माजिवडा प्रभाग समिती मधील हिरानंदानी इस्टेट येथील रिक्की वाईन आणि माटो माटो या बार च्या ओपन स्पेस मध्ये वाणिज्य दारूविक्री तसंच हुक्का पिण्यासाठी वापर केल्यावरून कृष्णनी आणि श्रध्देश मोहिते यांच्या बारवर कारवाई करण्यात आली. तसेच उपवन येथील बॉम्बे डक बारची अनधिकृत शेड तोडण्यात आली, हे हॉटेल प्रीतम रजपूत आणि संतोष रजपूत यांचे आहे. अनधिकृत बांधकाम प्रकरणी समिधा मोहिते, कृष्णानी आणि श्रध्देश मोहिते ,प्रीतम रजपूत,संतोष रजपूत यांच्यावर MRTP अन्वये गुन्हे दाखल होणार आहेत.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading