लोकमान्यनगर येथे एका राहत्या घरातून भरदिवसा सव्वा चार लाखांचा ऐवज चोरी झाल्याचा प्रकार घडला आहे. लोकमान्यनगर पाडा नंबर येथील राहत्या घरातील बाथरूमची खिडकी तोडून चोरट्याने त्या वाटे घरात प्रवेश करून लोखंडी कपाटातील सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा ४ लाख ३४ हजारांचा मुद्देमाल लंपास केल्याचा प्रकार घडला. याप्रकरणी वर्तकनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.