सहयाद्री मानव सेवा मंच अंतर्गत माळशिराज येथे पांडुरंगवारीत वारकरी माऊलींचे आरोग्यसेवा शिबीर

सहयाद्री मानव सेवा मंच अंतर्गत माळशिराज येथे पांडुरंगवारीत वारकरी माऊलींचे आरोग्यसेवा शिबीर आयोजित करण्यात आले होते. डॉ. विश्वास सापटणेकर यांच्या नेतृत्वाखाली सहयाद्री मानव सेवा मंच गेले कित्येक वर्ष पंढरीच्या वारीसाठी निघालेल्या वारकरी माऊलींची निस्वार्थ रुग्ण सेवा करीत आहेत. त्यांच्या सहयाद्री मानव सेवा मंच अंतर्गत असंख्य स्वयंसेवक आणि डॉक्टर्स सेवाकरी म्हणून काम करतात. विठूरायाचे दर्शन होत नाही पण माऊली भक्तांच्या रूपाने स्वयं पांडुरंग आपल्याला आशिर्वाद देतो असे प्रतिवादन डॉ.सापटणेकर यांनी केले. या शिबिरात सर्व वयोगटातील भक्तगण मुले, वयस्कर नागरिक, महिला तसेच वयोवृद्ध लाभ घेतात. या मध्ये विविध आजारांवर, दुःखण्यावर विशेषतः अंगदुखी, पायदुखी, सर्दी खोकला, ताप, त्वचाविकार आणि इतर आजारांवर इलाज करण्यात आले. मोफत उपचारासोबत काही रुग्णांना इंजेक्शन, सलाईन,छोट्या शस्त्रक्रियाही करण्यात आल्या. पायदुखी सारख्या दुखण्यावर स्वयंसेवकां कडून मसाज करण्यात आले. अंदाजे तेरा लाख भाविक भारतातील विविध भागातून पंढरपूरला वारीला येतात अशी माहिती स्वयंसेवक डॉ.राजेश मढवी यांनी दिली.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading