लिफ्ट कोसळून झालेल्या अपघात प्रकरणात मजूर ठेकेदारावर गुन्हा दाखल

ठाण्यातील लिफ्ट कोसळून झालेल्या अपघात प्रकरणी लेबर कंत्राटदारावर गुन्हा दाखल झाला आहे. कापूरबावडी पोलीस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला असून अद्याप तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. दरम्यान महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी विकासकावर गुन्हा दाखल करण्याबाबत सूचना दिल्या होत्या मात्र अद्यापही विकासकावर गुन्हा दाखल करण्यात आला नाही आहे. दरम्यान ठाणे महानगरपालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी ही दुर्घटना विकासकाच्या निष्काळजीपणा मुळे झाल्याचे समोर येत असल्याने पोलिसांना विकासकावर गुन्हा दाखल करण्यासंदर्भात सूचना दिल्याची माहिती दिली.

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading