लगाम तुटल्यानं उधळलेल्या घोड्याचा दुर्दैवी अंत

लग्न समारंभ आटपून परतताना लगाम तुटल्यानं उधळलेल्या घोड्याचा पाय घसरून रस्त्याच्या कडेच्या संरक्षक भिंतीवर आदळल्यानं घोड्याचा दुर्दैवी मृत्यू होण्याची घटना घडली. ठाण्यातील डॉ. आंबेडकर रोडवर राहणारे नंदकुमार चौधरी यांची घोडागाडी असून ते लग्न समारंभ आणि मिरवणुकीसाठी घोडे पुरवतात. काल घोडबंदर रोडवरील आनंदनगर येथील एका हॉटेलमध्ये लग्न समारंभ आटपून चौधरी हे घोड्याला घेऊन ठाण्यात येत होते. चौधरी हे दुचाकीवर होते तर त्यांच्या हातात घोड्याचा लगाम होता. तत्वज्ञान विद्यापीठाजवळ घोड्याला बांधण्यात आलेला लगाम तुटल्यानं दुचाकीवरील चौधरींच्या हातून लगाम निसटून घोडा चौखूर उधळला. तेव्हा बेलगाम रस्त्यावरून धावत असताना पाय घसरून घोडा रस्त्याच्या कडेच्या संरक्षक भिंतीला आदळला. त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्यानं घोड्याचा जागीच मृत्यू झाला. हे वृत्त कळताच आपत्ती व्यवस्थापन पथक आणि पशु वैद्यकीय अधिका-यांनी त्वरीत धाव घेतली. मात्र जबर धक्क्यामुळे डोक्याला गंभीर दुखापत होऊन घोड्याचा जागीच मृत्यू झाल्याचं सांगण्यात आलं.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading