जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या सेवानिवृत्त १८९ प्राथमिक शिक्षकांना निवड श्रेणीचा लाभ देण्यात आला आहे. तर २९८ प्राथमिक शिक्षकांना वरिष्ठ वेतन श्रेणीचा लाभ मिळाला आहे. ज्या शिक्षकांच्या सेवेची २४ वर्ष पूर्ण झाली आहेत आणि ज्या शिक्षकांची १२ वर्ष पूर्ण झाली आहेत अशा प्राथमिक सेवानिवृत्त आणि सेवा बजावत असणा-या शिक्षकांना मुख्य कार्यकारी अधिका-यांच्या निवड समितीनं हा लाभ दिला. निवड श्रेणी मिळालेले शिक्षक हे सेवानिवृत्त शिक्षक आहेत. त्यामुळं सेवानिवृत्तीनंतर मिळणा-या निवृत्ती वेतनात याचा लाभ होणार आहे. तर वरिष्ठ वेतन श्रेणी मिळालेल्या शिक्षकांच्या देखील वेतनात वाढ होणार आहे.