लंडन मॅरेथॉन स्पर्धा डॉ. महेश बेडेकर यांच्यासह सात स्पर्धकांकडून ठाण्यात पूर्ण

लंडन मॅरेथॉन स्पर्धेत काल ठाण्यातून ७ स्पर्धक सहभागी झाले होते. ठाण्यातील डॉ. महेश बेडेकर या मॅरेथॉन स्पर्धेत दुस-यांदा सहभागी झाले होते. त्यांनी ३ तास ३३ मिनिटांचा वेळ देत ही मॅरेथॉन स्पर्धा पूर्ण केली. या स्पर्धेत जगभरातून ४५ हजाराहून अधिक स्पर्धक सहभागी झाले होते. यंदाच्या कोरोनामय वातावरणामुळं लंडन मॅरेथॉन स्पर्धा व्हर्चुअली आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत सहभागी झालेल्या स्पर्धकांना आपापल्या शहरातूनच धावायचं होतं. काल पहाटे साडेचार वाजता या स्पर्धेला प्रारंभ झाला. स्पर्धेत डॉ. महेश बेडेकर, गीतांजली लेंका, यशविंदर सिंग, आदित्य रठ, रवि नाडर, हॅन्स क्रिस्टोफर, विजय गंभीरे असे ७ स्पर्धक या स्पर्धेत सहभागी झाले होते. या स्पर्धेसाठी एक खास ॲप तयार करण्यात आलं होतं. हे ॲप टीसीएसनं तयार केलं होतं. या ॲपच्या माध्यमातूनच हे सातही स्पर्धक या लंडन मॅरेथॉनमध्ये सहभागी झाले होते. शिकागो मॅरेथॉन स्पर्धेत डॉ. बेडेकर यांनी दिलेल्या वेळेमुळं त्यांची बोस्टन मॅरेथॉनसाठी निवड झाली असून कोरोनानंतर लवकरच ते बोस्टन मॅरेथॉनमध्ये सहभागी होणार आहेत. मॅरेथॉनसाठी रस्ता हा सपाट लागतो. पण ठाण्यातील रस्त्यांमध्ये चढउतार असल्यामुळं अशा रस्त्यांवर धावणं हे एक आव्हानात्मक होतं असं डॉ. महेश बेडेकर यांनी सांगितलं.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading