ठाण्यातील एसपीसीए या संस्थेत काल जागतिक वन्य प्राणी दिन साजरा

ठाण्यातील एसपीसीए या संस्थेत काल जागतिक वन्य प्राणी दिन साजरा करण्यात आला. एसपीसीए ही प्राण्यांवर उपचार करणारी ठाण्यातली एक महत्वपूर्ण संस्था आहे. गेल्या २० वर्षात एसपीसीए या संस्थेनं हजारो वन्यजीवांचे प्राण वाचवले आहेत. यामध्ये अगदी साप, घोरपड पासून ते अगदी विंचू, हत्ती, माकड, कासव अशा विविध जातींचे प्राणी येतात. या प्राण्यांवर उपचार करून नंतर त्यांना त्यांच्या नैसर्गिक अधिवासात या संस्थेनं सोडलं आहे. पक्ष्यांमध्ये अगदी देशी नव्हे तर विदेशी पक्षीही या ठिकाणी उपचारासाठी येतात. या संस्थेत कार्यकर्ते डॉक्टरांच्या सहाय्यानं विविध पक्ष्यांवर उपचारही करत असतात. ९९२०७७७५३६ हा या संस्थेचा हेल्पलाईन क्रमांक आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading