रेल्वे सुरक्षा दलाच्या दोन जवानांमुळे दोन प्रवाशांचे वाचले प्राण

कल्याण रेल्वे सुरक्षा दलाच्या दोन जवानांच्या सतर्कतेमुळं दोन प्रवाशांचा जीव वाचू शकला. या दोन जवानांनी गोदान या विशेष गाडीतून पडताना एका दाम्पत्याचा जीव वाचवला. गुरूवारी गोदान ही विशेष कोविड एक्सप्रेस कल्याण स्थानकातून मार्गस्थ होत होती. त्याचवेळी एक कुटुंब या गाडीमध्ये चढण्याचा प्रयत्न करत होतं. त्यांना सावध करण्याचा प्रयत्न करूनही हे कुटुंब गाडीत चढण्याचा प्रयत्न करत होतं. त्याचवेळी कामावर असलेले मुख्य कॉन्स्टेबल शेषराव पाटील यांनी या कुटुंबातील महिला गाडीतून पडत असताना त्यांनी पाहिलं आणि तात्काळ धाव घेत तिला गाडीत ढकललं. त्याचवेळी पुढच्या दारातून या बाईचा नवरा सामान घेऊन गाडीत चढत असताना पडत होता. पण त्यालाही त्यांनी आतमध्ये ढकललं. मात्र या गडबडीत त्यांचा मुलगा फलाटावर खालीच राहिला. गाडीत ढकललेले असफाक खान हे भिवंडीचे रहिवासी असून ते कल्याणहून शहागंजला चालले होते. रेल्वे सुरक्षा दलाचे जवान शेषराव पाटील आणि त्यांचे सहाय्यक एस पी यादव या दोघांचे असफाक खान यांचे चिरंजीव अफताब यांनी त्यांच्या मदतीबद्दल आभार मानले आहेत.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading