रेल्वे कोपरी पुलावर 4 गर्डर यशस्वी लॉन्च – आज रात्री 3 गर्डर बसणार

कोपरी पुलावर पहिल्या टप्प्यातील 7 गर्डर पैकी 4 गर्डर काल पहाटे पर्यंत लॉन्च करण्यात आली. त्यावेळी जिल्हा पालक मंत्री एकनाथ शिंदे ,खासदार राजन विचारे वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील उपस्थित होते. ही गर्डर 65 मीटर असून या 1गर्डर चे वजन 104 टन होते अशा 2 गर्डर जोडून बसविण्यात आले त्याचे एकूण वजन 208 टन होते या गर्डर उचलण्यासाठी भारतात पहिल्यांदाच रेल्वेने 1200 टन वजन पेलणारी पहिलीच क्रेन कोपरी येथे मागवण्यात आली होती.
ही गर्डर बसविण्यासाठी 7 क्रेन, 2 पुलर, 150 हुन अधिक मनुष्यबळ तैनात करण्यात आले होते. आज रात्री पुन्हा 3 गर्डर बसविण्यात येणार आहे तरी सर्व नागरिकांनी सहकार्य करण्याची विनंती पालकमंत्र्यांनी केली आहे.

 

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading