राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांच्या हस्ते ठाण्यातील तुळजाभवानी मंदिरात महाआरती

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांच्या हस्ते ठाण्यातील तुळजाभवानी मंदिरात महाआरती करण्यात आली. आज सकाळी गणेशवाडी येथील तुळजाभवानी मंदिरामध्ये ही महाआरती करण्यात आली. या महाआरतीमध्ये 108 महिलांनी आपला सहभाग नोंदविला होता. यावेळी वर्षातून एकदाच माझ्या आजी शारदाबाई पवार या नवरात्रौत्सवात उपवास करायच्या; शारदाबाई पवार यांच्यापासून सुरु आहे ही परंपरा माझ्या आईने कायम ठेवली होती. त्यामुळे नवरात्रौत्सव ही माझ्यासाठी आई आहे. या निमित्ताने मी महाविकास आघाडी सरकारचे आभार मानते की त्यांनी नवरात्रौत्सवातच मंदिरे उघडण्याची परवानगी दिली आहे. तरीही, सरकारने जे नियम घालून दिले आहेत. त्यांचे पालन करावे, असे आवाहनही सुप्रिया सुळे यांनी यावेळी केले.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading