राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवड्यानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने दाखले वाटप

राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवड्यानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने आज राज्य लोकसेवा हक्क आयोगाच्या कोकण महसूल विभागाचे प्रभारी आयुक्त किरण जाधव यांच्या हस्ते दाखले वाटप करण्यात आले. जिल्ह्यात सध्या राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा साजरा करण्यात येत आहे. त्याअंतर्गत जिल्हा प्रशासनाच्या वतीने विविध सेवांचा निपटारा करण्यात येत आहे. त्याअंतर्गत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने आज विविध दाखल्यांचे वाटप नागरिकांना करण्यात आले. यावेळी प्रातिनिधीक स्वरुपात पाच जणांना दाखल्यांचे वाटप करण्यात आले. नागरिकांना सुलभपद्धतीने आणि वेळेत दाखले देऊन सेवा देण्यात ठाणे जिल्हा आघाडीवर आहे. शाळा/महाविद्यालयांमध्ये दाखले वाटप, इंद्रधनु उपक्रमाअंतर्गत दाखले वाटप तसेच दाखले वाटपासाठी शिबिरांचे आयोजन असे नाविण्यपूर्ण उपक्रम जिल्हा प्रशासनाने राबविले आहेत.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading