ठाण्यात विविध ठिकाणी गरब्याची जोरात तयारी

सध्या नवरात्रौत्सव तोंडावर आला असून विविध ठिकाणी गरब्याची जोरात तयारी सुरू आहे. ठाण्यात आमदार रविंद्र फाटक, टेंभीनाका येथील आनंद दिघे यांचा जय अंबे माँ नवरात्रौत्सव, आमदार प्रताप सरनाईक यांचा नवरात्रौत्सव असे अनेक नवरात्रौत्सव प्रसिध्द आहेत. गेल्या दोन वर्षात कोरोनामुळे नवरात्रौत्सव साजरा होऊ शकला नव्हता. मात्र आता कोरोनाचे निर्बंध हटवण्यात आले आहेत. गरबा आयोजकांनी गरब्यासाठी मध्यरात्रीपर्यंत परवानगी द्यावी अशी मागणी शासनाकडे केली आहे. संकल्प मंडळ, तसंच रास गरबा रासरंग या गरबा उत्सवाच्या आयोजकांकडून उत्सवाची जय्यत तयारी सुरू आहे. संकल्प मित्रमंडळाच्या गरबा उत्सवासाठी सध्या सजावटीचं काम सुरू आहे. गरब्यासाठी लागणा-या काठ्या, नवरात्रौत्सवासाठी लागणा-या टोपल्या विक्री करण्यासाठी जळगावहून मोरे सकपाळ कुटुंबिय संकल्प मित्रमंडळात आले आहेत. रोज ३०० टोपल्या ते विकत आहेत. एक टोपली १०० ते दीडशे रूपयाला विकली जात आहे. कोरोनामुळे तेही दोन वर्ष व्यवसायाला मुकले होते. पण यंदा मात्र त्यांनी जोरदार कंबर कसल्याचं दिसत आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading