राज्य शासनानं मिशन बिगिन अगेनला पुन्हा एकदा ३१ जानेवारीपर्यंत मुदतवाढ दिली आहे. राज्यामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर लॉकडाऊन जाहीर करण्यात आलं होतं. या लॉकडाऊनमध्ये ३० सप्टेंबरला शिथिलता देण्यात आली. मिशन बिगिन अगेन असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी काही नवीन निकष जाहीर केले होते. या निकषांमध्ये प्रतिबंधात्मक क्षेत्र वगळता अनेक गोष्टींना सूट देण्यात आली होती. आता याच निकषांची मुदत ३१ जानेवारीपर्यंत वाढवण्यात आली आहे. त्यामुळं प्रतिबंधात्मक क्षेत्रामध्ये ३० सप्टेंबरच्या अध्यादेशानुसार सर्व निकष लागू राहणार असल्याचं मुख्य सचिवांनी जाहीर केलं आहे.