राज्यातील पहिलं नाविक संग्रहालय कल्याणमधील दुर्गाडी किल्ल्याजवळ उभारलं जाणार

राज्यातील पहिलं नाविक संग्रहालय कल्याणमधील दुर्गाडी किल्ल्याजवळ उभारलं जाणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी कल्याणमध्ये आपल्या आरमाराचा पाया रचला होता. मात्र नंतरच्या कालखंडात हा इतिहास काहीसा धूसर झाला होता. कल्याण-डोंबिवली महापालिकेनं हा इतिहास पुन्हा उभारण्यासाठी पुढाकार घेतला आहे. हे नाविक संग्रहालय उभारण्यासाठी नावेप्रमाणे शिल्प उभारलं जाणार असून यामध्ये विविध नौकांची माहिती दिली जाणार आहे. या संग्रहालयामध्ये एक ऑडिटोरियमही बांधलं जाणार असून या ऑडिटोरियम मध्ये नौदलाच्या झालेल्या विकासाविषयी माहितीपट दाखवले जाणार आहेत. हे संग्रहालय उभारण्यासाठी भारतीय नौदलाची मदत घेतली जाणार आहे. ४ एकरावर हे संग्रहालय उभारलं जाणार असून कल्याण खाडीवरील दुर्गाडी किल्ला ते खाडी पूल या दरम्यान ते असणार आहे. देशातील पर्यटकांना आकर्षित करण्याबरोबरच युवकांना नौदलात भरती व्हायची स्फूर्ती मिळावी असा या संग्रहालयामागचा उद्देश आहे. स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत हे संग्रहालय उभारलं जाणार आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading