राज्याच्या चित्ररथास प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात परवानगी नाकारल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे जोरदार निदर्शनं

राज्याच्या चित्ररथास प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात परवानगी नाकारल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे जोरदार निदर्शनं करण्यात आली. दरवर्षी २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिनी दिल्लीतील राजपथावर संचलन होत असतं. यामध्ये विविध राज्यांचे चित्ररथ संचलनात सहभागी होतात. पण यंदा राज्याच्या चित्ररथाचा प्रस्ताव नाकारला गेल्यानं या संचलनात महाराष्ट्र दिसणार नाही. केंद्र सरकारच्या या भूमिकेचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शनं करून निषेध केला. एक दो एक दो- मोदी सरकार को फेक दो, महाराष्ट्र में हम एक है -मोदी शहा फेक है, मोदी शहा मुर्दाबाद अशा विविध घोषणा देत कार्यकर्त्यांनी निषेध केला. गेल्या वर्षीच्या चित्ररथात सहभागी असलेला कलावंत गणेश सुखदेवही या निदर्शनामध्ये सहभागी झाला होता. यावर्षी महाराष्ट्राच्या चित्ररथाला जाणूनबुजून परवानगी नाकारून मोदी-शहा सरकारनं आपला महाराष्ट्र द्वेष दाखवला आहे. हा अवमान सहन केला जाणार नाही असा इशाराही यावेळी देण्यात आला.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading