राज्यस्तरीय सायक्लोथॉन स्पर्धेत ठाण्याचे माजी पोलीस अधिकारी प्रथम

साई पूजा स्पोर्टसतर्फे नुकत्याच झालेल्या खुल्या राज्यस्तरीय सायक्लोथॉन स्पर्धेत ठाण्याचे ७० वर्षीय माजी पोलीस अधिकारी प्रवीणकुमार कुलथे यांनी अव्वल स्थान पटकावले. ६६ ते ७० वयोगटातून त्यांनी प्रथम येण्याचा मान मिळवला. ते आता ३०० किमी अंतराच्या सायकल राईडला निघाले आहेत. आम्ही सायकल प्रेमी फौंडेशनचे ते सदस्य असून त्यांच्या या यशाबद्दल संस्थेने त्यांचे कौतुक केले. ही स्पर्धा हर्सूल सावंगीजवळील समृद्धी महामार्गावर आयोजित करण्यात आली होती. पुरुषांसाठी ३० किमी तर महिला गटासाठी १५ किमी अंतर ठेवण्यात आले होते. कुलथे यांनी १ तास ११ मिनिटात ३० किमीची राईड पूर्ण केली. कुलथे हे ठाण्याचे असून ते वरिष्ठ निरीक्षक पदावरून २०११ मध्ये निवृत्त झाले. वयाच्या ६६ व्या वर्षापासून ते सायकलिंगचा छंद जोपासत आहेत. आपल्या या यशाबद्दल आनंद व्यक्त करताना कुलथे म्हणाले की, “मी लॉंग टेनिस खेळाडू असून फिटनेसमध्ये भर पडावी म्हणून सायकलिंगची आवड जोपासण्यास सुरुवात केली.”. ते ठाणे – कोळवण – परत ठाणे अशी ३०० किमी अंतराची सायकल राईड करत आहेत.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading