जिल्ह्यात राष्ट्रीय जंतनाशक दिनानिमित्त जंतनाशक गोळ्या वाटप मोहिमेस सुरूवात

राष्ट्रीय जंतनाशक दिनानिमित्त ठाणे जिल्ह्यातील एक वर्ष ते 19 वर्षे वयोगटातील मुला-मुलींना मोफत जंतनाशक वाटप मोहिमेचे उद्घाटन आज आंबेगाव शिव प्राथमिक आरोग्य उपकेंद्रांअंतर्गत असलेल्या साई गावात जिल्हापरिषदेच्या अध्यक्षा पुष्पा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच दापोडे जिल्हा परिषद शाळेतील मोहिमेची सुरूवात आरोग्य सभापती वंदना भांडे यांच्या हस्ते झाले. दिवे अंजुर प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत असलेल्या दापोडे जिल्हा परिषद शाळेत आयोजित कार्यक्रमास जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.गंगाधर परगे , अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.आनंद गोसावी, भिवंडी तालुका गट विकास अधिकारी अशोक भवारी, सरपंच विजेता संतोष पाटील, पंचायत समिती सदस्य श्री. पाटील , तालुका आरोग्य अधिकारी डॉ.माधव वाघमारे, शाळेचे मुख्याध्यापक जगदीश, प्राथमिक आरोग्य केंद्राचे प्रभारी वैद्यकीय अधिकारी डॉ. धरणे आदी यावेळी उपस्थित होते. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. परगे यांनी मोहिमेविषयी उपस्थितांना माहिती दिली.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading