राज्यस्तरीय रिदमिक जिम्नॅस्टीक स्पर्धेत वैष्णवी मुणगेकरला ४ सुवर्णपदकं

राज्यस्तरीय रिदमिक जिम्नॅस्टीक स्पर्धेत ठाण्याच्या वैष्णवी मुणगेकरनं ४ सुवर्णपदकं पटकावून प्रथम क्रमांक मिळवला आहे. सीआयसीएसई कौन्सिल नॅशनल स्पोर्टस् २०१९ मध्ये ठाण्याच्या मुलींनी सर्वाधिक यश मिळवलं आहे. या स्पर्धा १४ आणि १७ वर्षाखालील अशा दोन गटात झाल्या. १४ वर्षाखालील गटात लोढा वर्ल्ड स्कूलच्या वैष्णवी मुणगेकरनं ४ सुवर्ण आणि १ कांस्य पदक पटकावलं तर याच शाळेच्या धर्मी सत्रानं ४ रौप्य आणि १ सुवर्णपदक पटकावत दुसरा क्रमांक मिळवला. व्हीसीडब्ल्यू आर्य स्कूलच्या परीना मदनपुत्रनं ४ कांस्य आणि १ रौप्य पदक पटकावत तिसरा क्रमांक मिळवला. १७ वर्षाखालील गटात सुलोचनादेवी सिंघानिया स्कूलच्या श्रेया भंगाळेनं पाचही सुवर्णपदक पटकावत प्रथम क्रमांक मिळवला. तर विबग्योर हायस्कूलच्या मैत्रेयी सेल्युकरनं ४ रौप्य आणि १ कांस्य पटकावलं. बिल्लाबाँग शाळेच्या जान्हवी ठाकूरनं ४ कांस्य आणि १ रौप्य पदक जिंकून तिस-या क्रमांकावर नाव कोरलं. १४ वर्षाखालील गटात १२ तर १७ वर्षाखालील गटात ९ शाळा सहभागी झाल्या होत्या. १४ वर्षाखालील गटात वैष्णवी, धर्मी, परीना तसंच ऋची ठोंबरे तर १७ वर्षाखालील गटात श्रेया, मैत्रेयी, जान्हवी आणि सिया यांची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading