ठाण्यातील रहेजा गार्डन परिसरात वादळामुळे अनेक झाडं पडली आहेत. तौक्ते चक्रीवादळाचा परिणाम ठाण्यात मोठ्या प्रमाणावर झाला असून अनेक ठिकाणी झाडं पडण्याच्या घटना घडल्या आहेत. वागळे इस्टेटमधील रहेजा गार्डन परिसरात या वादळी वारे आणि पावसामुळे आज अनेक झाडं पडून नुकसान झालं.