रस्त्यांवरील डेब्रीज उचला तसंच तुटलेले कफस्टोन, फुटपाथ तात्काळ दुरूस्त करण्याचे महापालिका आयुक्तांचे आदेश

महापालिका आयुक्तांनी आज पायी चालतच शहरातील सुशोभीकरण, फुटपाथ दुरुस्ती, रस्ते दुरुस्ती तसेच साफसफाई कामाची पाहणी करून रस्त्यावरील डेब्रीज उचलण्याचे आदेश देतानाच तुटलेले कफस्टोन तसेच फुटपाथ तात्काळ दुरूस्त करण्याचे आदेशही संबंधित अधिकाऱ्यांना दिले. आज सकाळी महापालिका आयुक्तांनी तीन हात नाका येथून चालतच सुशोभीकरण, खड्डे भरणे, फुटपाथ दुरुस्ती तसेच साफसफाई कामाची पाहणी करण्यास सुरुवात केली. यामध्ये तीन हात नाका, आयकर कार्यालय, राजदीप सोसायटी, मल्हार सिनेमा गोखले रोड, नौपाडा मुख्य मार्केट तसेच मासुंदा तलाव आदी ठिकाणांच्या रस्ते दुरुस्ती तसेच साफसफाई कामाची पाहणी केली. शहरातील प्रमुख रस्त्यावरील डेब्रीज तात्काळ उचलण्याचे आदेश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले असून तुटलेले कफस्टोन आणि फुटपाथ तात्काळ दुरूस्त करण्याचे आदेशही दिले. शहरातील ज्या दुकानांसमोर कचरा आहे त्या सर्व दुकानांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली असून रस्त्यावर कचरा टाकणाऱ्या आस्थापनांवर यापुढेही कडक कारवाई करण्याचे आदेश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

 

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading