रस्ते सुरक्षा मोहिमेअंतर्गत रक्तदान शिबिरात १०० वाहतूक पोलिस आणि रिक्षाचालकांसह ११० जणांनी केले रक्तदान

रस्ते सुरक्षा मोहिमेअंतर्गत ठाणे वाहतूक पोलीसांनी आयोजीत केलेल्या रक्तदान शिबिरात १०० वाहतूक पोलिस आणि रिक्षाचालकांसह ११० जणांनी रक्तदान केले. वाहतूक शाखेतील पोलिस कर्मचारी तसेच, पालिका आणि टीएमटीच्या सेवेतील सुमारे १३३ जणांची डोळे आणि कानांची तपासणी यावेळी करण्यात आली. नेत्र तपासणी केलेल्या १३३ वाहन चालकांपैकी ९९ जणांना नेत्र विकारांनी ग्रासल्याचे या तपासणीत निष्पन्न झाले आहे. १८ जणांना अँलर्जी, ११ जणांना मोतीबिंदू तर, ६ जणांना रेटीनाचे आजार आढळले आहेत. तीन हात नाका येथील वाहतूक पोलीस उपायुक्त कार्यालयात झालेल्या या शिबिराचे उद्घाटन पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांच्या हस्ते झाले. या शिबिरात उपस्थितांना मास्क वाटपही करण्यात आले.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading