रस्ता रूंदीकरणातंर्गत बाधित अनधिकृत बांधकामावर महापालिकेचा हातोडा – एकाविरूद्ध गुन्हा दाखल

दिवा प्रभाग समिती क्षेत्रात रस्ता रूंदीकरणातंर्गत दीवा आगासन रोड येथील बाधित अनधिकृत बांधकामावर धडक कारवाई करून एकाविरूद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला. दिवा प्रभाग समितीमधील गणेश नगर दीवा आगासन रोड येथील रस्ता रुंदीकरणात बाधित होत असलेल्या गाळाधारक एकनाथ गायकर यांचे दोन गाळे आज जेसीबीच्या साहाय्याने निष्कासित करण्यात आलेत. तसेच अनधिकृत बांधकाम केल्याप्रकरणी अरुण म्हात्रे यांच्या विरुद्ध मुंब्रा पोलीस स्टेशन येथे फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading