रक्तानंद ग्रुपतर्फे नववर्षाच्या मध्यरात्री रक्तदान

ठाण्यामध्ये रक्तदान करून नववर्षाचं स्वागत करण्यात आलं. ठाणे जिल्हा शिवसेना शाखा आणि रक्तानंद ग्रुपतर्फे दरवर्षी नववर्षाच्या मध्यरात्री रक्तदानाचं आयोजन केलं जातं. यावर्षीही शिवाजी मैदानात असं रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आलं होतं. शिवसेनेचे तत्कालीन जिल्हा प्रमुख आनंद दिघे यांनी या रक्तदान शिबीराची सुरूवात केली होती. नववर्षाचं स्वागत मद्यप्राशन करून अथवा पार्ट्या करून केलं जातं. पण रक्तानंद ग्रुपतर्फे मात्र नववर्षाचं स्वागत गेली अनेक वर्ष रक्तदानानं केलं जातं. यावर्षी कोरोनामुळे रात्रीची संचारबंदी लागू असतानाही युवकांनी रक्तदान केलं. जवळपास दीडशेहून अधिक रक्ताच्या बाटल्या या रक्तदान शिबीरात जमा झाल्या. खासदार श्रीकांत शिंदे यांनीही या रक्तदान शिबीरात स्वत: रक्तदान केलं. या रक्तदान शिबीरात एकहून अधिकवेळा रक्तदान करणा-या रक्तदात्यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते खास गौरव करण्यात आला.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading