कोविड रूग्णालयातील रक्तदान शिबीरात कोविडमुक्त रूग्णांचं रक्तदान

सध्या कोविडच्या काळामध्ये रक्ताची टंचाई निर्माण झाली असून मुख्यमंत्र्यांनीही रक्तदान करण्याचं आवाहन केलं आहे. या आवाहनाला प्रतिसाद देत ठाण्यातील बाळकूम येथील कोविड रूग्णालयात रक्तदान शिबीराचं आयोजन करण्यात आलं होतं. विशेष म्हणजे या रक्तदान शिबीरात कोरोनामुक्त झालेल्या रूग्णांनीही रक्तदान केलं. या रूग्णालयातून बरे झाल्यावर रूग्णालयातील रूग्णांना संपर्क साधून रक्तदान करणार का अशी विचारणा करण्यात आली होती. त्याला रूग्णांनीही मोठा प्रतिसाद दिला. हे पाहून या रूग्णालयात काम करणारे डॉक्टर, नर्स, कर्मचारी, सुरक्षा कर्मचारी यांनीही रक्तदान केलं. जवळपास ५०० हून अधिक रक्त बॅग या शिबीरात जमा करण्यात आल्या. २०० हून अधिक कोविड मुक्त रूग्णांनीही या रक्तदान शिबीरात आपलं रक्त दान केलं.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading