येऊर एन्व्हायर्मेंट सोसायटीच्या वतीने आषाढी अमावास्येच्या दिवशी स्वच्छता मोहिम

आषाढी अमावास्येच्या दिवशी येऊर येथे स्वच्छता मोहिम राबवण्यात आली. येऊर एन्व्हायर्मेंट सोसायटीच्या वतीने गेली काही वर्ष आषाढी अमावस्येला ‘ हरित येऊर, स्वच्छ येऊर’ मोहीम राबवली जाते. या वर्षी सुध्दा रविवारी निसर्ग अभ्यासक रोहित जोशी यांच्या पुढाकाराने ही मोहिम राबवण्यात आली. या मोहिमेत सरस्वती सेकंडरी स्कुल च्या चमूचाही सहभाग होता. मराठा जागृती मंच चे कार्यकर्ते सुद्धा या मोहिमेत सहभागी होते. विद्यार्थ्यांनी भेंडी नाला परिसरातील दहा पोती कचरा जमा केला. जिज्ञासा ट्रस्ट चे सुरेंन्द्र दिघे आणि होप संस्थेचे श्याम घाटे यांनी निसर्ग आणि पर्यावरण संवर्धन या विषयी छात्रसैनिकांना मार्गदर्शन केले. ‘हरित सेना’ ही संकल्पना विद्यार्याच्यात रुजवावी या साठी सरस्वती सेकंडरी स्कुल निश्चित सहकार्य करेल असे आश्वासन सुरेंन्द्र दिघे यांनी यावेळी आयोजकाना दिले.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading