यशोधननगर भागात राहणाऱ्या तरुणाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार

वर्तकनगर परिसरातील यशोधननगर भागात राहणाऱ्या रोहीत आवटे या तरुणाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार शुक्रवारी उघडकीस आला. तो घरात एकटाच राहत होता. याप्रकरणी आकस्मिक मृत्युची नोंद वर्तकनगर पोलीस ठाण्यात करण्यात आली असून त्याच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. रोहीतचे मित्र काल सायंकाळी त्याला भेटण्यासाठी घरी आले होते. मात्र त्याने दरवाजा उघडला नाही. त्यानंतर, त्याच्या मित्रांनी रहिवाशांच्या मदतीने दरवाजा उघडला. तेव्हा रोहीतने गळफास घेतल्याचे आढळले. या घटनेची माहिती रहिवाशांनी वर्तकनगर पोलिसांना दिल्यानंतर वर्तकनगर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सुहास हुत्तेकर हे घटनास्थळी दाखल झाले. मृतदेहाजवळ आत्महत्येपूर्वी लिहीलेली कोणतीही चिठ्ठी आढळून आलेली नाही. त्यामुळे आत्महत्येचे कारण अस्पष्ट असल्याचे त्यांनी सांगितले.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading