यंदाच्या दहीहंडी उत्सवात उत्साहाचा अभाव

ठाण्यामध्ये यंदा प्रथमच दहीहंडी दरम्यान फारसा उत्साह जाणवला नाही. सांगली, कोल्हापूर मध्ये आलेल्या पूराचा परिणाम दहीहंडी उत्सवावर झाला होता. ठाण्यामध्ये शिवसेनेची टेंभीनाका येथील दहीहंडी, खासदार राजन विचारे यांची रंगो बापूजी चौकातील दहीहंडी, आमदार रविंद्र फाटक आणि प्रताप सरनाईक यांची दहीहंडी, स्वामी प्रतिष्ठानची हिरानंदानी मिडोज येथील दहीहंडी तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची भगवती शाळेच्या मैदानातील दहीहंडी प्रसिध्द आहे. मात्र यंदा दहीहंडी उत्सवात उत्साहाचा अभाव दिसत होता. छोट्या छोट्या उभारल्या जाणा-या हंड्या यंदा फारशा दिसल्या नाहीत. खासदार राजन विचारे यांनी आपला दहीहंडी उत्सव रद्द केला होता. जय जवान गोविंदा पथकानं महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि संस्कृती प्रतिष्ठानच्या दहीहंडीत ९ थर लावून सलामी दिली.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading