दहीहंडी उत्सवात सर्वोच्च न्यायालयाच्या निर्बंधांची सर्रास पायमल्ली

सर्वोच्च न्यायालयाने दहीहंडी उत्सवावर काही निर्बंध लावले असले तरी या निर्बंधांची कालच्या उत्सवात सर्रास पायमल्ली झाली. दहीहंडी उत्सवात उत्साह नसला तरी ध्वनिप्रदूषण काही प्रमाणात झालं. बहुतांशी मंडळांनी ध्वनिप्रदूषणाबाबतचे नियम धाब्यावर बसवले होते. दहीहंडी उत्सवासाठी येणाऱ्या गोविंदा पथकांच्या बेशिस्त वागण्यामुळे काही ठिकाणी लोकांना त्रासही झाला. लांबलांबच्या भागातून ठाण्यातील दहीहंडी फोडण्यासाठी आलेल्या गोविंदा पथकांची वाहनं ही बेशिस्तपणे लावण्यात आली होती. काही ठिकाणी तर गृहसंकुलांच्या प्रवेशद्वारासमोरच बेशिस्तपणे दुचाक्या उभ्या केल्यामुळे या गृह संकुलातील रहिवाशांनाही त्याचा त्रास झाला. रात्री उशिरा दुचाकीवरून जाताना गोविंदा पथक मोठमोठ्याने हॉर्न वाजवत, घोषणा देत जात होते त्यामुळेही रहिवाशांनाही त्याचा त्रास झाला.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading