मोबाईलद्वारे आर्थिक फसवणुकीच्या प्रकारांमध्ये दिवसेंदिवस वाढ

मोबाईलद्वारे आर्थिक फसवणुकीच्या प्रकारांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असून उल्हासनगर मधील रियल इस्टेट एजंट दीपक लालवाणी यांची मोबाईलच्या माध्यमातून ५ लाखांची फसवणूक झाली आहे. एका अनोळखी व्यत्तीने त्यांना व्हॉट्स अॅप मॅसेज करून त्यात एक लिंक पाठविली आणि फोन करून आयडीएफसी बॅंकेचा कर्मचारी बोलत आहे असे सांगुन या लिंक व्दारे त्यांना एक रूपया पाठवुन ओटीपी टाकण्यास सांगितले. त्यानंतर आरोपीने लालवाणी यांच्या कोटक बॅंक क्रेडीट कार्ड बॅंक खातेतुन 5 लाखांची रक्कम ऑनलाईन काढुन घेवुन त्यांची आर्थिक फसवणुक केली आहे. या प्रकारानंतर लालवाणी यांच्या तक्रारीवरून अनोळखी व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर दुस-या एका घटनेत बदलापूरमधील शैलेशकुमार शहा या व्यापा-याची साडेतीन लाखांची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. शैलेशकुमार शहा यांना अनोळखी व्यक्तीने फोन करून TEAM VIWER हे अॅप डाउनलोड करण्यास सांगुन त्याव्दारे लाईटबील भरण्यास सांगितले. आरोपीच्या सांगण्याप्रमाणे त्यांनी पैसे भरले त्यानंतर त्यांचा रजिस्टर मोबाईल नंबर घेवुन त्यांचे बॅंक खातेतुन 3,67,760 रूपये रक्कम आॅनलाईन काढुन घेवुन त्यांची आर्थिक फसवणुक केली आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading