मेट्रो पिलरच्या कामामुळे घोडबंदर रोडवरील वाहतुकीत बदल

मुंबई मेट्रोच्या पिलर टाकण्याच्या कामामुळे विहंग हिल्स सोसायटी ते घोडबंदर रोडवरील नागला बंदर या दरम्यान 19 ते 28 एप्रिल या कालावधीत वाहनांना प्रवेश बंद करण्यात आला आहे. रात्री 23.55 ते सकाळी 4 वाजेपर्यंत मुंबई-नाशिक महामार्गाने घोडबंदर रोडच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांना कापूरबावडी जंक्शन येथे प्रवेश बंद करण्यात आला आहे. तसेच मुंबईकडून तत्वज्ञान विद्यापीठ मार्गे घोडबंदर रोडकडे जाणाऱ्या वाहनांना माजीवाडा गोल्डन डाईज ब्रिजवरील वाय जंक्शन येथे प्रवेश बंद करण्यात आला असल्याची माहिती वाहतूक शाखेचे उपायुक्त बाळासाहेब पाटील यांनी कळविली आहे. मुंबई मेट्रो लाईन 4 चे कासारवडवली ते गायमुखपर्यंत काम चालू आहे. या मेट्रो -4 चे पिलरवर विहंग हिल्स सोसायटी ते नागला बंदर, घोडबंदर रोड, ठाणे या ठिकाणी गर्डर टाकण्याचे काम करण्यात येणार आहे. त्यासाठी या भागातील वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. वेदांत हॉस्पीटल घोडबंदर रोड ठाणे या ठिकाणी गर्डर टाकण्याचे काम करण्यात येणार आहे. त्यावेळी या भागातील वाहतुकीत पुढीलप्रमाणे बदल करण्यात आले आहे. मुंबई- नाशिक महामार्गाने घोडबंदर रोडच्या दिशेने जाणाऱ्या अवजड वाहनांना तत्त्वज्ञान विद्यापीठ, कापूरबावडी जंक्शन येथे प्रवेश बंद करण्यात येत आहे. या दिशेने जाणारी जड अवजड वाहने कापूरबावडी सर्कल येथून उजवे वळण घेवून बाळकुम नाका, भिवंडी आग्रा रोड, कशेळी, काल्हेर, अंजुरफाटा, भिवंडीमार्गे इच्छित स्थळी जातील. तसेच इतर हलकी वाहने ही पिलर क्र.61 ते 68 वर गर्डर टाकण्याच्या वेळी विहंग हिल्स सोसायटी येथून डावीकडे वळण घेवून सर्व्हिस रोडने नागला बंदर येथे उजवीकडे वळण घेवून घोडबंदर रोडमार्गे इच्छित स्थळी जातील. मुंबईकडून कापूरबावडी जंक्शन, तत्त्वज्ञान विद्यापीठमार्गे घोडबंदर रोडकडे जाणाऱ्या सर्व जड, अवजड वाहनांना माजीवाडा गोल्डन डाईज ब्रिजवर वाय जंक्शन येथे प्रवेश बंद करण्यात येत आहे. ही वाहने नाशिक रोडने खारेगांव टोलनाका, मानकोली नाका, अंजुर फाटामार्गे इच्छित स्थळी जातील.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading