मेट्रो पिलरच्या कामामुळे वाहतुकीचं नियोजन

मेट्रो पिलरच्या कामामुळे वाहतुकीचं नियोजन करण्यात आलं आहे. ठाण्यातील कॅडबरी जंक्‍शन या ठिकाणी मेट्रो 4 च्या पिलर बसविण्याच्या कामामुळे कॅडबरी जंक्शन ते विवियाना मॉल आणि चिरागनगर कडे जाणारी सर्वप्रकारची वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात येत असल्याची माहिती वाहतूक शाखेचे पोलिस उपआयुक्त बाळासाहेब पाटील यांनी दिली. कॅडबरी जंक्शन येथील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी 10 फेब्रुवारी पर्यंत ही व्यवस्था लागू राहणार आहे. कॅडबरी जंक्शन ते विवियाना मॉल, चिरागनगर कडे सर्व्हिस रोडने जाणा-या सर्व प्रकारच्या वाहतुकीस कॅडबरी जंक्शन सर्व्हिस रोड येथे प्रवेश बंद करण्यात येत आहे. ही वाहने कॅडबरी जंक्शन वरून मुंबई नाशिक महामार्गाने ज्युपीटर हॉस्पीटल समोरील जागेतून डावीकडे वळण घेवून सर्व्हिस रोडने इच्छित स्थळी जाऊ शकतील.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading