मेट्रोच्या कास्टींग यार्डसाठी घेतलेल्या जमिनीचा मोबदला मिळावा किंवा शेतजमिनीचं भाडं सुरू करावं – शेतक-यांची मागणी

मेट्रोच्या कास्टींग यार्डसाठी घेतलेल्या जमिनीचा मोबदला मिळावा किंवा शेतजमिनीचं भाडं सुरू करावं अशी मागणी वाघबीळ येथील शेतक-यांनी केली आहे. घोडबंदर येथील कावेसर, वाघबीळ आणि कोलशेत येथील शेतजमीन ही ठाणे मेट्रोसाठी लागणा-या कास्टींग यार्ड उभारणीसाठी आरक्षित करण्यात आली आहे. ही जमीन संपादनाचं काम मुंबई महानगर विकास प्राधिकरणानं रिलायन्सला दिलं आहे. रिलायन्सनं हे काम सुरू केलं आहे. प्रत्यक्षात ही जागा स्थानिक शेतक-यांची असून ते या शेत जमिनीवर पिढ्यान् पिढ्यांपासून कसत आहेत. या शेतक-यांना विश्वासात न घेता रिलायन्स कंपनीनं शेतजमिनीमध्ये माती भरणीचं काम चालू केलं आहे. शेतक-यांच्या आरक्षित जमिनीपैकी ९ ते १० एकर जमीन कोणालाही विक्री करण्यात आलेली नाही. शेतकरी मेट्रोच्या कास्टींग यार्डसाठी जमिनी देण्यास तयार असून मात्र त्याचा मोबदला पैशाच्या स्वरूपात द्यावा किंवा शेतजमिनीचं भाडे सुरू करावे अशी या शेतक-यांची मागणी आहे. आमदार प्रताप सरनाईक यांनी या शेतक-यांना उचित न्याय द्यावा अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading