मेट्रोच्या कामामुळे घोडबंदर रोडवरील वाहतुकीत बदल

मेट्रोच्या कामामुळे घोडबंदर रोडवरील वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. मुंबई मेट्रो लाईन-4 चे कासारवडवली ते गायमुखपर्यंत काम सुरू आहे. ओवळा सिग्नल ते वेदांत हॉस्पिटल या ठिकाणी मेट्रो 4 चे पिलरवर गर्डर टाकण्याचे काम करण्यात येणार आहे. यावेळी ठाण्याकडून घोडबंदर रोड कडे येणारी वाहतुक बंद करण्यात येणार आहे. अशी माहिती शहर वाहतूक विभागाचे पोलीस उप आयुक्त बाळासाहेब पाटील यांनी दिली आहे. मुंबई-नाशिक महामार्गाच्या घोडबंदर रोडच्या दिशेने जाणा-या अवजड वाहनांना तत्वज्ञान विद्यापीठ, कापूरबावडी जंक्शन येथे प्रवेश बंद करण्यात येत आहे. त्यामुळे अवजड वाहने कापूरबावडी सर्कल येथून उजवे वळण घेवून बाळकुम नाका, भिवंडी आग्रा रोड, कशेळी, काल्हेर, अंजुर फाटा, भिवंडी मार्गे इच्छित स्थळी जातील. तसेच इतर हलकी वाहने ओवळा सिग्नल येथे डावीकडे वळण घेवून विहंग सोसायटी समोरून उजवीकडे वळण घेवून घोडबंदर रोड मार्गे जातील.
मुंबई कडून कापूरबावडी जंक्शन, तत्वज्ञान विद्यापीठ मार्गे घोडबंदर रोडकडे जाणाऱ्या सर्व जड, अवजड वाहनांना माजीवाडा गोल्डन डाईज ब्रिजवर वाय जंक्शन येथे प्रवेश बंद करण्यात येत आहे. ही जड अवजड वाहने नाशिक रोडने खारेगांव टोलनाका, मानकोली नाका, अंजुर फाटा मार्गे इच्छित स्थळी जातील. गर्डर टाकण्याचे काम पूर्ण होईपर्यंत हा वाहतूक बदल राहणार आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading