मुख्यमंत्र्यांच्या जनगौरव सोहळ्याला अध्यात्मिक स्पर्श

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ठाण्यातील विविध सेवाभावी संस्थांकडून होणाऱ्या नागरी जनगौरवाच्या सोहळ्यास त्र्यंबकेश्वरच्या अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठाचे पिठाधिश गुरुमाऊली श्री आण्णासाहेब मोरे आणि कोल्हापूरच्या कणेरी येथील सिद्धगिरी मठाचे मठाधिपती अदृश्य काढसिद्धेश्वर स्वामी हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. 13 ऑगस्ट रोजी काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात होणाऱ्या या जनगौरव सोहळ्यावेळी गुरुमाऊली आण्णासाहेब मोरे आणि काढसिद्धेश्वर स्वामी हे मुख्यमंत्र्यांना आशीर्वाद देतील, अशी माहिती मुख्यमंत्री जनगौरव समितीचे कार्याध्यक्ष प्रा.प्रदीप ढवळ यांनी दिली. सर्वसामान्य कष्टकरी समाजाचे प्रतिनिधीत्व करणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नागरी सत्कारावेळी या दोन अध्यात्मिक व्यक्तिमत्त्वांची उपस्थिती या सोहळ्याला लाभणे ही मंगलदायक घटना ठरेल, असे प्रदीप ढवळ यांनी सांगितले.

 

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading