मुंब्र्यानंतर कोपरीची करोना मुक्तीकडे वाटचाल

कोरोनावर मात करुन 0 पेशंटच्या दिशेने ठाण्याची वाटचाल सुरु झाली आहे. मुंब्रा येथे गेल्या आठवड्यात 0 पेशंट झाल्यानंतर आज ठाणे पूर्व कोपरी विभाग देखील 0 पेशंट आहे. नागरिकांनी दाखवलेला संयम, पाळलेली शिस्त, ठाणे महापालिकेचे सर्व अधिकारी, कर्मचारी, आरोग्य कर्मचारी, डाँक्टर, नर्स, आरोग्य सेविका , आशा वर्कर्स, पोलीस कर्मचारी, ए एन एम हेल्थ केअर वर्कर्स तसेच सर्व लोकप्रतिनिधी या सगळ्यांनी पालकमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली काम केले. कोणत्याही विम्याचे संरक्षण नसताना सर्व लोकप्रतिनिधी, स्वयंसेवी कार्यकर्ते स्वतःचा जीव धोक्यात घालून अहोरात्र झटत आहेत. लोक प्रतिनिधी आणि प्रशासन हातात हात घालून काम करीत असल्यामुळे ठाणे आता कोरोना मुक्त होण्याची वाटचाल करीत आहे याबद्दल महापौर नरेश म्हस्के यांनी सर्वांचे कौतुक करत अजूनही नियम पाळण्याची गरज असून सहकार्य करा असं आवाहन केलं आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading