रेल्वे मोटरमनच्या प्रसंगावधानामुळे एक मोठा अपघात टळला

रेल्वे मोटरमनच्या प्रसंगावधानामुळे एक मोठा अपघात टळला. रेल्वे मार्गावर झाड कोसळलं असल्याचं रेल्वे मोटरमनच्या लक्षात आलं. त्यामुळे त्यांनी तातडीनं ब्रेक दाबून ही गाडी थांबवली. अन्यथा मोठा अपघात झाला असता.

मुंब्रा येथे रेल्वे स्थानकाजवळ काल रात्री पावणे नऊच्या सुमारास गुलमोहराचे मोठे झाड रेल्वे पटरीच्या बाजूला पडले. यामध्ये कोणतीही दुखापत झाली नाही. आपत्ती व्यवस्थापन कक्षात प्राप्त झालेल्या तक्रारीनुसार मुंब्रा जुना बोगद्या जवळ, रोशनी अपार्टमेंटच्या मागे गुलमोहराचे मोठे झाड पडले होते. झाडाचा काही भाग जलद रेल्वे पटरी क्रमांक ६ च्या बाजूला पडला होता. आपत्ती व्यवस्थापन विभागाचे कर्मचारी आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीनं धाव घेऊन झाडाचा धोकादायक भाग आणि जलद रेल्वे ट्रॅकच्या बाजूला पडलेला झाडाचा भाग कापून बाजूला केला. तसेच उर्वरित झाड कापून बाजूला करण्यासाठी रेल्वे विभागाकडून रेल्वे ब्लॉक न मिळाल्याने उपस्थित असलेले रेल्वे विभागाचे अभियंता यांच्या आदेशाने या ठिकाणचे काम थांबविण्यात आले. तसेच या ठिकाणी उपस्थित असलेले वृक्ष प्राधिकरण विभागाचे वृक्ष विशारद यांच्या सांगण्यानुसार या पडलेल्या झाडामुळे कोणताही धोका नसल्याने हे झाड आज सकाळी वृक्ष प्राधिकरण विभागाकडून कापून बाजूला करण्यात आले.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading