मुंबई आणि ठाण्याला जोडणारा कोपरी पूल चाचणीसाठी आज आणि उद्या बंद राहणार

मुंबई आणि ठाण्याला जोडणारा कोपरी पूल चाचणीसाठी आज आणि उद्या बंद राहणार आहे. सकाळी साडेसात ते साडेदहा आणि संध्याकाळी ५ ते ९ या दरम्यान वाहनं बंद ठेवून सर्व वाहने नवीन पूलावरून सोडण्यात येणार आहेत. सध्या असलेला गुरुद्वार येथील कोपरी कडे जाणारा मार्ग बंद करून तीन हात पुलाजवळ केलेल्या रॅम्प वरुन सकाळी काही वाहने गुरुद्वारा सेवा रस्त्यावरून मुंबई कडे जातील आणि संध्याकाळी काही वाहने हरीओम नगर कडून सेवा रस्त्याने गुरुद्वारा मार्गे तिन हात नाका पुलाखाली येतील. त्यामुळे नवीन कोपरी पुलावरील वाहनांची संख्या कमी होण्यास मदत होईल. दरम्यान कोपरी हरीनिवास किंवा गोखले रोडने तीन हात नाका पुलाच्या डाव्या बाजूने कोपरी पुलाकडे जाण्यास प्रवेश बंद करण्यात आला असून त्यांना सेवा रस्त्याचा वापर करावा लागेल.
हा बदल आज आणि उद्या फक्त दोन दिवसांसाठी असून त्यांनंतर वाहतुक नियोजनाचा निदर्शनास येणार-या त्रुटींची पुर्तता करुन लवकरच जुना कोपरी पुल पुर्ण कामासाठी मुंबई महानगर विकास प्राधिकरणाकडे देण्यात येणार आहे .

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading