मुंगूसाच्या केसापासून पेंटींग ब्रश तयार करण्याच्या प्रकरणातील मुख्य आरोपीला अटक

मुंगूसाच्या केसापासून पेंटींग ब्रश तयार करण्याच्या प्रकरणातील मुख्य आरोपीला वन परिक्षेत्र ठाण्याच्या पथकानं अटक केली आहे. २४ ऑक्टोबरला वाईल्ड लाईफ वेलफेअर असोसिएशननं मीरारोड येथे कारवाई केली. या कारवाईत मुंगूसाच्या केसापासून तयार करण्यात आलेले १३ हजार २०६ पेंटींग ब्रश जप्त करण्यात आले. या प्रकरणात महम्मद आलम याला अटक करण्यात आली होती. पण मुख्य आरोपी महम्मद आझाद हा फरार होता. त्याला काल अटक करण्यात आली. वन्यजीव विषयक कोणतीही तक्रार असल्यास १९२६ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क करावा असं आवाहन वन विभागातर्फे करण्यात आलं आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading