मास्क न लावणा-या 1990 व्यक्तींविरूद्ध कारवाई – 9 लाख 50 हजारांचा दंड वसूल

सार्वजनिक ठिकाणी, शासकीय कार्यालये, खासगी कार्यालये तसेच मार्केट या ठिकाणी मास्क न वापरणाऱ्या 1990 व्यक्तींविरूद्ध दंडात्मक करण्यात आली असून 9 लाख 50 हजारांचा दंड वसूल वसूल करण्यात आला आहे. महापालिका आयुक्तांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली असून यापुढे देखील कारवाई सुरूच ठेवण्याच्या सूचना त्यांनी सर्व सहाय्यक आयुक्तांना दिल्या आहेत. महापालिकेच्या प्रभावी उपाययोजनांमुळे कोरोना संसर्ग कमी झाला असला तरी देखील शहरात सार्वजनिक ठिकाणी, शासकीय कार्यालये तसेच खासगी कार्यालये या ठिकाणी मास्क न वापरणाऱ्या व्यक्तींची संख्या वाढतच आहे. विना मास्क फिरणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्यासाठी महापालिकेने गेल्या तीन आठवड्यापासून विशेष मोहीम घेतली आहे. ठाणे महापालिकेच्या नऊ प्रभाग समितीमध्ये गेल्या २१ दिवसात शहरात विना मास्क फिरणाऱ्या 1190 व्यक्तींविरूद्ध कारवाई करून दंड वसूल करण्यात आला आहे. यामध्ये नौपाडा प्रभाग समिती 387, वर्तकनगर 265 , माजिवडा मानपाडा 296, उथळसर 240, कळवा 187, मुंब्रा 123, लोकमान्यनगर 185, वागळे 95 आणि दिवा प्रभाग समिती अंतर्गत 120 व्यक्तींविरूद्ध कारवाई करून
एकूण 9 लाख 50 हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

 

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading