मासुंदा तलाव सुशोभिकरण कामाची महापालिका अतिरिक्त आयुक्तांनी केली पाहणी

ठाणे महापालिका आणि स्मार्ट सिटी यांच्या वतीने सुरु असलेल्या मासुंदा तलाव सुशोभिकरण कामाची अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांनी पाहणी करून तलाव परिसरात नियमीत साफसफाई, पाणपोई पदपथाचे रुंदीकरण तसेच झाडांच्या फांद्यांची छाटणी करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या. ठाणे महापालिका आणि स्मार्ट सिटी यांच्या वतीने मासुंदा तलावाच्या सुशोभिकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. या सुशोभीकरण कामाची पाहणी करून कामाच्या प्रगतीचा आढावा घेतला. यामध्ये अँम्पी थिएटरची नियमीत साफसफाई, पाणपोई पदपथाचे रुंदीकरण करणे, झाडांच्या फांद्यांची छाटणी करणे, इतर उद्यान विषयक कामे, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळील दगडी बांधकामांना पॉलिश करणे तसेच परिसरातील सुरक्षा यंत्रणा आदी कामे तात्काळ करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर वोल्टास कोव्हीड हॉस्पिटलची पाहणी करून संपूर्ण यंत्रणा सुसज्ज ठेवण्याचा सूचनाही त्यांनी दिल्या.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading